देशाचे नेते तथा भारतीय काँग्रेस पक्षाचे
उदगीर / प्रतिनिधी
आज भारतीय काँग्रेस पक्षाचे नेते माननीय राहुल जी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने 19-06-2020 ते 25-06-2020 सेवा सप्ताह चे आयोजन करण्यात आले आहे.यात विविध समाज उपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या साप्ताहाची सुरवात वीटभट्टीवर काम करणाऱ्या जवळपास 200 कामगारांना अन्नधान्य वाटप करून राहुलजी गांधी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.विजयभैया निटूरे, उदगीर जळकोट विधानसभेचे अध्यक्ष अमोल कांडगिरे,लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्रीनिवास एकुर्केकर व विधानसभेचे सर्व सरचिटणीस व पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.