कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे व खत वाटप मोहीमे चा शुभारंभ

कृषी विभागामार्फत बांधावर बियाणे व खत वाटप मोहीमे चा शुभारंभ



उदगीर  प्रतिनिधी 



 कृषी विभागामार्फत सध्याच्या लॉक डाउन च्या  परिस्थितीमुळे शेतकरी परेशान असून आगामी खरिपाची पेरणी संदर्भात शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते बी-बियाणे आदींची उपलब्धता करून  देण्यासाठी या मोहिमेचा शुभारंभ उदगीर येथे
 येथे मा .ना. श्री. संजय बनसोडे, राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य व  जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष मा.ना. श्री. राहुलभैया केंद्रे साहेब यांचे हस्ते पार पडला याप्रसंगी  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी , श्री .दत्तात्रय गावसाने , कृषी विकास अधिकारी, जि.प.लातुर श्री . सुभाष चोले,  उपविभागीय कृषी अधिकारी , उदगीर, श्री .महेश तीर्थंकर ,.तहसीलदार, उदगीर श्री .व्यंकटेश मुंढे, तालुका कृषी अधिकारी,उदगीर  श्री .सिद्धेश्वर मोकळे ,कृषी अधिकारी पंचायत समिती उदगीर श्री . यशपाल सातपुते, कृषी सहायक श्री .सुनील चव्हाण व शेतकरी उपस्थित होते .
त्यानंतर उदगीर , जळकोट व देवणी तालुक्याची  खरीप हंगाम पूर्व नियोजन  बैठक घेण्यात आली त्यासाठी कृषी  , महसूल , पोलीस अधिकारी ,  प्रतिनिधीक स्वरूपात शेतकरी , खत विक्रेते उपस्थित होते .त्यामध्ये बियाणे , खत उपलब्धता व त्याचे शेतकऱ्यांना वितरण याबाबत चर्चा करण्यात आली ..