गोरगरीब गरजू लोकाना अन्नधान्य भाजीपाला व फळे वाटप ला.जि. प. व बा. सभापती सौ ज्योतीताई बापूराव राठोड यांच्या हास्ते

गोरगरीब गरजू लोकाना अन्नधान्य भाजीपाला व फळे वाटप ला.जि. प. व बा. सभापती सौ ज्योतीताई बापूराव राठोड यांच्या हास्ते



 उदगीर / प्रतिनिधी


 गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी धावून जाणारे गुणाई शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा लातूर जिल्हा परिषदेचे चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती बापूराव राठोड यांच्यासोबत राहून आपण देखील सामाजिक जाणीव जपावीअसे वाटले.  आपल्यात  समाजसेवी वृृृृती जोपासली पाहिजेत हे हे विचार मनाशी बाळगून आपण समाजसेवेत उतरलेल्या आहोत. असे विचार लातूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ ज्योतीताई बापूराव राठोड यांनी व्यक्त केले. उदगीर तालुक्यातील बॉर्डर तांडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका तांड्यावर जवळपास दोनशे कुटुंबियांना अन्नधान्य, भाजीपाला, फळफळावळ वाटप कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या. तब्बल एक ट्रॅक्टर टरबूज, एक ट्रॅक्टर भाजीपाला, एक टेम्पो भरून अन्नधान्याचे किट स्वखर्चाने त्यांनी या गोरगरिबांना वाटप केले. विशेष म्हणजे या बॉर्डर तांड्यावरील 60 ते 65 व्यक्ती उदरनिर्वाहासाठी मुंबईला राहत होत्या, ते लोक गावी आले म्हणून त्यांना होम कोरंणटाइल व्हायला सांगण्यात आले होते. या तांडा पासून कर्नाटकाची सीमा दीडशे मीटर वर असल्याने कर्नाटका च्या बाजूने चेक पोस्ट बसविण्यात आले आहे. तसेच राज्याच्या सीमा बंद करण्यात आले असल्यामुळे, महाराष्ट्राच्या बाजूनेही ही या तांड्याच्या अलीकडे दीडशे मीटर अंतरावर चेक पोस्ट बसविण्यात आले आहे. यामुळे या तांड्यातील नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी देखील बाहेर पडता येत नव्हते. गरज भासली तर त्या घरातील महिलांना बाजार साठी उदगीरला यावे लागत होते. मात्र सद्यस्थितीत त्यांची आर्थिक परिस्थिती खालावली असल्यामुळे त्यांना बाहेर पडणेही शक्य नव्हते ,आणि घरात ही अन्नधान्य नव्हते. या गोष्टीची माहिती समजतात राठोड कुटुंबीयांनी तातडीने त्या तांड्यावरील जवळपास 200 कुटुंबीयांना मदत करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. आणि  आज त्यांनी अन्नधान्य आणि भाजीपाला, फळे वाटप केली. याप्रसंगी जि.प.चे माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती बापूराव राठोड ,भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष पंडितराव सुकणीकर, प्राध्यापक पंडित सूर्यवंशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना सौ. ज्योतीताई राठोड म्हणाल्या की, या तांड्यावर मोठ्या प्रमाणात बंजारा समाजातून या समाजाचे नेतृत्व करणारे बापूराव राठोड यांच्या मनात या तांड्यावरील गोरगरिबांच्या सेवेसाठी धावून जाण्याचे विचार सतत येत होते. त्याची परिपूर्णता सामाजिक ऋण फेडण्याचा रूपाने आज पूर्णत्वास आली आहे. समाजसेवेसाठी आपण सतत प्रयत्नशील राहू, गोरगरीब जनतेचे सेवा करण्याचा  प्रयत्न करत राहू. असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.