जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे यांचा.
थेट स्पॉट पंचनामा.!
उदगीर / प्रतिनीधी
मास्क ब्लॅकमध्ये विकले जात असून डेटॉल सारख्या हॅन्डवॉशची तुट निर्माण केली जात आहे. अशात सर्वसामान्य मानसांच्या नजरा आता सरकारी हॉस्पीटल व त्यांच्याकडून मिळणाऱ्या सोयीसुविधावर लागलेल्या आहेत. त्यामूळे, प्राथमिक आरोग्य केंद्राची जबाबदारी वाढली आहे. परंतु, अजूनही काही आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी बेशिस्त आहेत. त्यांना लगाम घालण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेचे दबंग, तरुण तडफदार अध्यक्ष राहूल केंद्रे यांनी सगळी सुत्र आपल्या हाती घेतले असून अनियमितता व ढिसाळपणा दिसल्या ठिकाणी ते थेट स्पॉट पंचनामा करताना पहावयास मिळत आहेत.
शनिवारी रात्री त्यांनी उदगीर व जळकोट तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात धडक दिली. आणि अनियमितता होत आहे का.? याची सखोल पाहणी केली. त्यात, उदगीर तालूक्यातील वाढवणा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे दिसून आले. तसेच, कोराना संदर्भातील उपाययोजनेचा अभाव प्रकर्षाने दिसून आला. त्यामूळे, त्यांनी तात्काळ स्पॉट पंचनामा केला आणि संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कडक कारवाईची शिफारस केली आहे.
कोरोनासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असताना ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्र कामात कसूर करत आहेत. सदरिल कारवाईचा धसका इतरांनीही घेतला असून यापूढे आरोग्य केंद्रात ढिसाळपणा दिसणार नाही अशी अपेक्षा आहे.
कारवाईनंतरही चित्र बदललेले दिसले नाही तर अध्यक्षांची दबंगगिरी अधिक कडक होईल यात शंका नाही. तसा त्यांनी सर्वांना इशाराही दिलेला आहे.
*राहूलजी तुमच्या सकारात्मक दृष्टीकोनास खुप शुभेच्छा.