हिंदु खाटिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व अ.भा. खा. स. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन--जिल्हाध्यक्ष -महादेव घोणे
उदगीर - लातूर जिल्ह्यातील उदगीर,देवणी, जळकोट,चाकूर,अहमदपूर, निलंगा तालुक्यातील सर्व हिंदु खाटिक समाज बांधवांना कळविण्यात येते की दि.१९ नोव्हेंबर २०१९ रोजी उदगीर येथे अखील भारतीय खाटिक समाज जि.लातूर(ग्रा.)संघटनेच्या वतीने १ ली ते पदवी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व विद्यार्थींनींचा सत्कार करण्यात येणार आहे तसेच अखील भारतीय खाटिक समाज संघटनेचे लातूर जिल्ह्यात कार्य वाढवून हिंदु खाटिक समाजातील प्रत्येक कुटुंबाचे व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे प्रश्न सोडवण्यासाठी जिल्ह्यातून तालुक,शहरनिहाय पदाधिकाऱ्यांची निवड करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अखिल भारतीय खाटिक समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय घोलप, सरचिटणीस सुजीत धनगर, महाराष्ट्र युवा प्रकोष्ठ अध्यक्ष बंटी निकुडे पाटील , राष्ट्रीय कोर कमेटी सदस्य जयराज घोलप, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडीच्या प्राचार्य मैनाताई साबणे, संपर्क प्रमुख अनिल थोरात, मुंबई, गणेश घोडके, मुंबई व लातूर जिल्ह्यातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या संघटनेच्या माध्यमातून संघटनेची बांधणी करून समाजातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे यामध्ये जातीचे नवीन प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र, रेशन कार्ड,अपंगाचे प्रमाणपत्र , समाजातील बेरोजगारांना रोजगार निर्मीती, सुशिक्षीतांना शासनकीय नौकरीत समावेश करतेवेळी येणाऱ्या अडचणी सोबत विविध प्रश्न सोडवण्यासाठी हे संघटन मजबूत करण्यात येणार आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर,देवणी, जळकोट,चाकूर,अहमदपूर, निलंगा या तालुक्यातील सर्व हिंदु खाटिक समाजातील पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचे इ.१ ली ते पदवी मध्ये किमान ६० टक्केच्या वर गुण प्राप्त केले आहेत अशा पाल्यांच्या पालकांनी अखील भारतीय खाटिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव घोणे मो.-७७७५०६७६०० व प्रदेश सचिव - नागेश साबणे -७५८८०६३८०० यांच्याकडे दि. १४ नोव्हेंबर २०१९ पर्यंत आपल्या पाल्यांचे मार्क मेमो देण्यासाठी संपर्क साधावे. दि.१९ नोव्हेंबर २०१९ रोजी सायं.४ वा. हा कार्यक्रम मातृभूमी महाविद्यालय,एल.आय.सी.ऑफिसच्या पाठीमागे, विकास नगर देगलूर रोड, उदगीर येथे आयोजीत करण्यात आले असून या दिवशी सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन दु. ३ वा.पर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित रहायचे आहे. सत्काराच्या वेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते संघटनेचे मोमेंटम, प्रमाणपत्र व गुच्छ देऊन सत्कार करण्यात येणार आहे जेणेकरून हिंदु खाटिक समाजातील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण व्हावी व ते भविष्यात स्वत:च्या पायावर उभे रहावे. तरी लातूर जिल्ह्यातील उदगीर,देवणी, जळकोट,चाकूर,अहमदपूर, निलंगा या तालुक्यातील सर्व हिंदु खाटिक समाजातील पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा असे आवहान अखील भारतीय खाटिक समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव घोणे यांनी केले आहे.
______________
मा. संपादक / प्रतिनिधी
कृपया वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक / साप्ताहिक मध्ये प्रसिद्धिस देऊन सहकार्य करावे ही नम्र विनंती
आपला
श्री. महादेव पा. घोणे
जिल्हाध्यक्ष -अ.भा. खा.स. जि. लातूर ( ग्रा. )