सानेगुरुजी विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
उदगीर येथील साने गुरुजी विद्यालयात इ. 10 वीच्या विदयार्थ्यांनी 5 वी ते 9 वीच्या  विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करून स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. दहावीच्या अनेक विद्यार्थी -विद्यार्थिनींनी एक दिवस शिक्षक - शिक्षिका बनून शाळा आपल्या ताब्यात ठेवली. अतिशय उत्कृष्टपणाने या विद्यार्थ्यांनी ज्ञानार्जनाचे कार्य पार पाडले.यानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांना संस्था व शाळेच्या वतीने पुढील शिक्षणासाठी निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजच्या स्वयंशासन दिनाच्या मुख्याध्यापिका प्राची बागबंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक सुशांत कोंडेकर तसेच व्यासपीठावर संस्थाध्यक्ष बापूसाहेब कज्जेवाड, सचिव मनोजदादा पुदाले, जेष्ठ समाजवादी विचारवंत दिगंबरराव बुरस्पट्टे, ऍड. उन्मेष हिबारे, अमोल बागबंदे आदी मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी आज आलेले अनुभव सांगितले. तसेच सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचलन अंबिका हुडगे हिने तर आभार देविदास खिंडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वांचे सहकार्य लाभले.
Popular posts
सार्वजनिक ठिकाण बनले मालकीचे ठिकाण ...कोण्ही यावे आपले घाण टाकून जावे
Image
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
कौळखेड येथे डॉ. दीपक सोमवंशी यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
Image
निडेबन जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ. दीपक सोमवंशी यांचा ऐतिहासिक विजय; मतदारांचे मानले जाहीर आभार
Image