कौळखेड येथे डॉ. दीपक सोमवंशी यांचा ग्रामस्थांकडून सत्कार
उदगीर /प्रतिनिधी :   
निडेबन जिल्हा परिषद सर्कलमधून विक्रमी मताधिक्याने निवडून आलेले डॉ. दीपक सोमवंशी यांनी कौळखेड येथे भेट देत मतदारांचे आभार मानले. यावेळी गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती होती.
निवडणुकीत दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. दिपक सोमवंशी यांनी आपल्या विजयाचे श्रेय मतदारांना दिले. “माजी मंत्री तथा आमदार संजय भाऊ बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. निवडून येणे हा शेवट नसून विकासकामांच्या माध्यमातून विश्वास संपादन करणे ही खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.गावातील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, स्वच्छता, शैक्षणिक सुविधा, आरोग्य आणि शासकीय योजनांचा शेती साहित्य  लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यांना प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांच्या समस्या ऐकून त्या सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कार्यक्रमास सरपंच छाया देविदास राठोड, शोभाताई कोणमारे, माजी सरपंच परशुराम चव्हाण, रमेश घुगे, पांडुरंग कांबळे, दिगंबर कांबळे, माजी संरपच गोरख गायकवाड, पांडुरंग चव्हाण, संतोष राठोड, आनंद कोणमारे, गुंडेराव बिरादार, शिवराज भंगूरे, शेषाबाई राठोड, राहुल गायकवाड, शंकर बोईनवाड, अविनाश गायकवाड,  वानखेडे सर ,. शिंदे सर, प्रेम गायकवाड, शिवा पकोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.ग्रामस्थांनी नव्याने निवडून आलेल्या प्रतिनिधीकडून विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला.
Popular posts
सार्वजनिक ठिकाण बनले मालकीचे ठिकाण ...कोण्ही यावे आपले घाण टाकून जावे
Image
सानेगुरुजी विद्यालयात स्वयंशासन दिन व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न.
Image
1920 ऐतिहासिक माणगाव परिषद राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर
Image
निडेबन जिल्हा परिषद निवडणुकीत डॉ. दीपक सोमवंशी यांचा ऐतिहासिक विजय; मतदारांचे मानले जाहीर आभार
Image